ताज्या घडामोडीमनोरंजन

ममता कुलकर्णी ‘महामंडलेश्वर’ ही पदवीनंतर वादाच्या भोवऱ्यात

खासगी आयुष्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टींबद्दलचे खुलासे होण्याची शक्यता

पुणे : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या तिला मिळालेल्या ती किन्नर आखाड्याच्या ‘महामंडलेश्वर’ पदवीबाबत अनेक वाद निर्माण झाले. अनेकांनी याला विरोध केला. त्यानंतर ममता कुलकर्णी ही प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. यानंतर तिला टीव्ही शो ‘आपकी अदालत’मध्ये मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं.त्यावेळेस अनेक गोष्टींचे खुलासे तिने केले आहेत.

‘महामंडलेश्वर’ ही पदवीनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी दीर्घकाळ मीडियापासून दूर राहिली आणि नुकतीच भारतात परतली आणि पुन्हा एकदा चर्चेत आली. 2025 च्या महाकुंभात ‘महामंडलेश्वर’ ही पदवी मिळाली आहे. ‘आपकी अदालत’मध्ये ममताने बॉलिवूड सोडण्याच्या आणि निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने बोलली आहे.

जोरजोरात सप्त श्लोकी दुर्गा पाठ म्हणण्यास सुरुवात
दरम्यान या मुलाखतीचे बरेचसे छोटे व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या मुलाखतीत रजत शर्मा यांनी तिला महामंडलेश्वर होण्यासाठी वेदांचे ज्ञान असले पाहिजे का असं विचारलं. तसेच ममता कुलकर्णी संन्यासी बनन्याचं ढोंग करतेय का? असे काही प्रश्न विचारताच ममता कुलकर्णीने चक्क जोर जोरात मंत्र बोलण्यास सुरुवात केली.

ममताने सप्त श्लोकी दुर्गा पाठ म्हणण्यास सुरुवात केली, जे ऐकून लोकांनी तिचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवल्या. मात्र, सोशल मीडियावर काही लोक तिच्या या श्लोकांमध्येही चुका शोधून काढत तिला ट्रोल करत आहेत. या मुलाखतीदरम्यान ममताकडून बॉलिवूडपासून ते तिच्या खासगी आयुष्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टींबद्दलचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धाउत्तराखंड 2024-25 खो-खोत महाराष्ट्रचा दुहेरी धमाका!

चित्रपटसृष्टी सोडण्याचे कारण
रजत शर्माने ममता यांनी ममताला बॉलिवूड सोडण्याचं कारण विचारलं. यावर ममताने सांगितले की बॉलीवूड हा एक भ्रम आहे आणि लोक फक्त शान-शौकतच्या मागे धावत आहेत हे तिला समजले आहे. हाच तो काळ होता जेव्हा त्याने आध्यात्मिक जीवनाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.

अंमली पदार्थांच्या तस्करीत नाव आल्याने वाद
ममता कुलकर्णीने 2000 च्या दशकाच्या सुरूवातीला फिल्म इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर केले होते आणि त्यानंतर 2016 मध्ये तिचे नाव ड्रग स्मगलिंग प्रकरणातही आले होते. या प्रकरणात तिचा कथित पती विक्की गोस्वामी याचेही नाव समोर आले असून तो आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या वादानंतर ममता भारत सोडून दुबई आणि नंतर केनियामध्ये राहू लागली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button