Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

आतड्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ चार फळे सर्वोत्तम!

Best Fruits for Gut Health : सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांचा धोका वाढला आहे. याचबरोबर, कर्करोगासारखा जीवघेणा आजारही लोकांना वेगाने ग्रासत आहे. आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्था आणि त्यातील चांगल्या बॅक्टेरियावर होतो. त्यामुळे आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. आहारतज्ज्ञांच्या मते आतड्यांसाठी काही फळे अतिशय फायदेशीर आहेत.

किवी

किवीमध्ये एक्टिनिडिन नावाचे एन्झाइम आढळते. हे प्रथिने तोडून पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि प्रीबायोटिक्स आतड्यांना मजबूत करतात. किवीचे सेवन केल्याने सूज आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी होतो.

हेही वाचा – वेलकम टू द जंगल’ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई, अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले

लिंबूवर्गीय फळे

लिंबू, संत्री आणि ग्रेपफ्रूट यांसारखी लिंबूवर्गीय फळे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. यात व्हिटॅमिन सी व फ्लेवोनॉइड्स चांगल्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ नष्ट करतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

सफरचंद

सफरचंदातील पेक्टिन फायबर गट बॅक्टेरियासाठी खूप फायदेशीर असते. हे फायबर आतड्यांमध्ये तुटते, तेव्हा ब्युटीरेट नावाचे फॅटी अ‍ॅसिड तयार होते. जे कर्करोगाच्या पेशींपासून बचाव करते. सफरचंदाच्या सालामध्ये क्वेरसेटिन नावाचा एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतो.

कलिंगड

कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि पचनक्रिया दुरुस्त ठेवते. यात असलेले लायकोपीन हे अँटिऑक्सिडंट कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. तसेच, ते कोलनसह इतर अनेक कर्करोगांचा धोका कमी करते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button