‘मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’; गौतमी पाटील
![Gaitmi Patil said that the Maratha community must get reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Gaitmi-Patil-780x470.jpg)
पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काहि महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. यावरून लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. मराछा आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी मागणी गौतमी पाटीलने केली आहे. ती पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होती.
गौतमी पाटील म्हणाली, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज अनेकांना आरक्षण हवंय, त्यामुळे ते मिळालंच पाहिजे. मलाही आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय.
हेही वाचा – अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंचा संघात समावेश
गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलनं वेगळा फड निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघी एकत्र डान्स करतानाही दिसत नाहीत. यावर भाष्य करताना गौतमी पाटील म्हणाली, हिंदवी पाटीलचं चांगलं होवो. आमच्यातून कोण फुटून गेलं, तर आम्ही त्याला गद्दार अजिबात म्हणत नाही. त्यांचं उलट चांगलं होऊ दे.
गौतमीला राजकारणात जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, मी अजिबात राजकारणात जाणार नाही. नवा चित्रपट मिळाला तर करेन. चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही. तसेच सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही, असंही गौतमी म्हणाली.