पॉर्नस्टार मिया खलिफाची ‘Bigg Boss OTT2’ मध्ये एन्ट्री?

Bigg Boss OTT2 : बिग बॉस ओटीटी सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली आहे. सलमान खान बिग बॉस ओटीटी सीझन-२ होस्ट करणार आहे. हा संपुर्ण सीझन जीओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. हा नवा सीझन यशस्वी करण्यासाठी पॉर्नस्टार मिया खलीफा, राज कुंद्रा तसेच श्रीलंकन गायक योहानी यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचं मीडिया रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे.
पॉर्नस्टार मिया खलीफाला बिग बॉस ओटीटी २ मध्ये येण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी मियाला बिग बॉस ९ साठी देखील बोलावण्यात आले होते. याबाबतचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलं आहे.
हेही वाचा – Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात १४ जूनपर्यंत दाखल होणार

मिया खलिफाने आता अडल्ट चित्रपटांमध्ये काम करेणं बंद केलं आहे. आता तिला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे. मिया खलिफाचे जगभरातील चाहते या बातमीने खूप खूश आहेत आणि काही जण तर तिला बिग बॉस ओटीटीवर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे अशीही बातमी आहे की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रालाही बिग बॉसमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. अश्लील चित्रपट बनवून विक्री केल्याप्रकरणी राजचे नाव समोर आले आहे.





