श्रीदेवीसोबत दिसणाऱ्या ‘या’ स्टारकिड लहाणपणीचे फोटो ला ओळखलंत का?
![Do you know the baby photos of 'this' Starkid seen with Sridevi?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/544134-khushi-kapoor-1-780x470.webp)
या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्यालातुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे. सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे.
कोण आहे ही स्टारकिड
ही स्टारकिड (starkids) दुसरी तिसरी कोणी नसून खुशी कपूर आहे. श्रीदेवीची (sridevi) मोठी मुलगी जान्हवी कपूरने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि काही वेळातच बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर श्रीदेवीची (sridevi) धाकटी मुलगी खुशी कपूरही लवकरच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान वरील फोटो हा खुशी कपूरचा लहानपणीचा आहे. 5 नोव्हेंबर 2000 रोजी खुशी कपूरचा जन्म झाला आहे. आता ती 22 वर्षांची असून तिला तिची आई श्रीदेवीची खूप आठवण येते.
खुशी कपूरची तिची बहीण जान्हवी कपूरसोबत चांगली बाँडिंग आहे. अनेकदा दोघी बहिणी सोशल मीडियावरही एकत्र फोटो पोस्ट करत असतात. दरम्यान आता चाहत्यांना खुशी कपूरच्या बॉलिवूड एन्ट्रीची उत्सुकता लागली आहे.
फोटोत काय?
फोटोत तुम्ही पाहू शकता, श्रीदेवीच्या खांद्यावर एक चिमुकली मुलगी बसली आहे. या फोटोमध्ये श्रीदेवीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. तर तिच्या खांद्यावर असलेल्या चिमुकलीने लाल रंगाचा फ्रॉक घातला आहे. या चिमुकलीचे वय दोन-तीन वर्षांचे असल्याचे समजते. ही चिमुकली श्रीदेवीची छोटी मुलगी आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.