TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधायक : चांगभलं प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सागर थोरात यांची सामाजिक बांधिलकी

वाढदिनी सामाजिक उपक्रम : महेश लांडगे यांच्या शिलेदाराची शहरात चर्चा

पिंपरी । प्रतिनिधी
तरुणाईची प्रचंड क्रेझ असलेले आमदार महेश लांडगे यांचा कट्टर समर्थक असलेले सागर थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चांगभल प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सामाजिक कार्य केले जाते. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर थोरात आहे. भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांचे थोरात निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात.
सागर थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशमंदिर, नेवाळेवस्ती, चिखली येथे उद्या, दि. १० डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच मोफत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबीर आणि गरजु रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे.


गहुंजे येथील माई बालभवन आश्रम येथे रविवारी दैनंदिन आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येईल. तसेच सामाजिक बांधिलकी म्ळणून संत तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिर येथील गोशाळेला गोदान करण्यात येणार आहे. या गोशाळेच्या माध्यमातून धर्मशाळेतील गरजू विद्यार्थ्यांचे संगोपन केले जाते.

गौतमी पाटीलच्या उपस्थितीमुळे शहरभर चर्चा…
सोशल मीडियावर कमालीची प्रसिद्ध झालेली लावणी कलावंत गौतमी पाटील हिच्या उपस्थितीत दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी कृष्णानगर येथील नूतन शाळा मैदानावर अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विशेष वैद्यकीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. गौतमी पाटील हिच्या उपस्थितीमुळे सागर थोरात यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याची संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button