प्रियांका चोप्रानं फसवणूक करत जिंकली मिस वर्ल्ड? सामान्य स्पर्धकांचे गंभीर गुण
![Did Priyanka Chopra cheat and win Miss World? Critical points of common competitors](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/534037-priyanka-chopra-won-miss-world-competition-by-cheating-reveals-former-contestant-780x470.webp)
मुंबई : मिस USA स्पर्धेत मिस टेक्सास आर बोनी गॅब्रिएलच्या विजयानंतर बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ) अचानक चर्चेत आली आहे. 2000 सालात झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धक नं प्रियंका चोप्रावर धक्कादायक आरोप केले होते. ही त्यावेळची मिस बार्बाडोस आणि सध्या एक यूट्यूबर आहे. एक व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, ‘त्यावेळी मिस वर्ल्ड स्पर्धा ही फिक्स करण्यात आली होती आणि सर्वांना माहित होते की प्रियांका चोप्रा जिंकणार आहे.’ तिच्या या वक्तव्यानंतर प्रियांका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
प्रियांका मिस वर्ल्ड होणार सगळ्यांना माहित होते
मिस टेक्ससमध्ये कसा भेदभाव केला यावर म्हणाली, ‘मिस वर्ल्ड स्पर्धेत मी नेमका याच गोष्टीचा सामना केला.’ त्यावेळचे फोटो आणि बातम्यांचे कटिंग्ज शेअर करत म्हणाली, ‘मी मिस बार्बाडोस होते आणि मिस वर्ल्डमध्ये गेले होते आणि ज्या वर्षी मी गेले तेव्हा मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली. त्या वर्षी सर्व स्पॉन्सरशिप हे भारतीयाचे होते.’
म्हणाली, ‘एका भारतीयानं संपूर्ण मिस वर्ल्ड स्पर्धेला स्पॉन्सर केलं होतं. आज मला त्यावेळी प्रियांका चोप्राच्या फेवरेटिज्मविषयी आठवलं की एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे तिला एक ड्रेस परिधान करत स्विमसूट राऊंड पार केला होता. तिचा स्किनटोन हा एकसारखा दिसायला हवा म्हणून क्रीम वापरण्यास परवानगी दिली, म्हणजे तिच्या त्वचेचा रंग एकसारखा दिसेल. मी असं नाही म्हणतं की कोणती ब्लीज क्रीम होती, ही एक स्किन टोन क्रीम होती.