अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी? टीमने दिले स्पष्टीकरण
![Death threat to actress Pooja Hegde? Explained by the team](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/pooja-hegde-780x470.jpg)
Pooja Hegde : बॉलिवूड चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका क्लबच्या उद्घाटनाला गेलेल्या पूजा हेगडेला अशा जीवे मारण्याच्या धमक्या आल्यावर बऱ्याच लोकांनी चिंता व्यक्त केली.
अभिनेत्री पूजा हेगडे एका क्लबच्या उद्घाटनासाठी दुबई याठिकाणी गेली होती. तिथे एका व्यक्तीबरोबर पूजाचे चांगलेच वाद झाले अन् त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याची बातमी समोर आली होती. नुकतंच पूजाच्या टीमने याबद्दल स्पष्टीकरण देत या खोट्या बातमीचे खंडन केले आहे.
हेही वाचा – ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची वाढ; पहा आजचे दर
#PoojaHegde Did NOT Get Death Threats In Dubai, Actress' Team Clarifieshttps://t.co/5iSP6tyuCp
— Free Press Journal (@fpjindia) December 13, 2023
पूजाच्या टीममधील एका व्यक्तिने ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ती व्यक्ति म्हणाली, ही खोटी बातमी कुणी पसरवली हे अद्याप आम्हाला ठाऊक नाही. हे अत्यंत धादांत खोटं आहे. पूजाला कुणीही जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही.
दरम्यान, पूजा हेगडे तिच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती शाहिद कपूरबरोबरच्या ‘देवा’ या चित्रपटात झळकणार आहे. याबरोबरच ती ‘हाऊसफूल ५’मध्येही दिसणार आहे.