Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
#CoronaVirus: कनिकाची पाचव्यांदा कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्हच, पण सध्या प्रकृती स्थिर

बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिची गेल्या आठवड्याभरापासून पाचव्यांदा कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली. पाचव्यांदाही कनिकाची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दर ४८ तासांनी कनिकाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या आठवड्यातही तिच्या चाचणीचे अहवाल आले असून तिच्या चाचण्या पॉझिटिव्हच दाखवत आहेत.

कनिका सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूड ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिची प्रकृती सध्या स्थिर असून चिंता करण्याचं कारण नाही असं इथल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.





