Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

दिल्लीतील कोविड केंद्राच्या निर्मितीसाठी बिग बींनी दिले २ कोटी

नवी दिल्ली – देशभर कोरोनाग्रस्तांच्या खाटा आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. या परिस्थितीत महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गुरुद्वारामध्ये कोविड केंद्राच्या निर्मितीसाठी अमिताभ यांनी दोन कोटी रुपयांची मदत दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी मदत केलेल्या रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 300 खाटांची सोय असणार आहे. या कोविड सेंटरचे नाव श्री गुरू तेग बहादुर कोविड केंद्र फॅसिलिटी असे असणार आहे. यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचीही सोय असणार आहे. हे कोविड केंद्र रुग्णांसाठी खुले होणार आहे. तसेच या केंद्रात कोरोनाबाधितांवरील उपचार पूर्णपणे मोफत होणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button