ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी कला गटाकडून ६ कार्यशाळांची घोषणा
![Announcement of 6 workshops by Jnanprabodhini Alumni Art Group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-30-at-6.12.12-PM-780x470.jpeg)
पुणे : ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून ६ कार्यशाळांची घोषणा करण्यात आली आहे. बेसिक्स ऑफ वॉटर कलर पेंटिंग्ज (जलरंग चित्रकार विलास कुलकर्णी),म्युझिक ऍप्रिसिएशन(डॉ. समीर दुबळे), बेसिक्स ऑफ ऑइल पेंटिंग्ज (युवा चित्रकार स्नेहल पागे),आवाज साधना सर्वांसाठी (डॉ. समीर दुबळे व स्पीच थेरपिस्ट वृषाली गवाणकर),राजस्थान-मध्यप्रदेशातील लोकनृत्य (संजय महाजन ),महाराष्ट्रातील लोकनृत्य(विवेक ताम्हणकर ) अशा या कार्यशाळा आहेत.
सर्व कलाप्रेमींसाठी या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.विविध कलांची ओळख करून घेणे व काही अपरिचित ,मूलभूत तंत्र समजून घेणे हा या कार्यशाळांचा हेतू आहे.कला गटाच्या वतीने अस्मिता अत्रे ,डॉ समीर दुबळे,डॉ वैदेही केळकर,मिलिंद संत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या एकदिवसीय कार्यशाळा दि.२ ऑक्टोबर पासून टप्प्या टप्प्याने ज्ञान प्रबोधिनी येथे होणार आहेत.अधिक माहितीसाठी ९५७९९००१२९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.