ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अंकिता लोखंडेचा पहिल्या घराबद्दलचा व्हिडीओ तुफान व्हायरल

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ते घर सुंशात याचं होतं आणि ते 4BHK नसून वेगवेगळे 2BHK फ्लॉट

मालाड : ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अंकिता लोखंड कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अंकिता हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता तिच्या मुंबईतील पहिल्या घराबद्दल बोलताना दिसत आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. व्हिडीओवर चाहते कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत.

व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडे म्हणते, मी पहिल्यांदा माझं घर घेतलं. जे मलाड या ठिकाणी आहे. ते घर खरेदी करणं माझ्यासाठी फार खास आहे. फार कमी वयात मी घर खरेदी केलं. मुंबईत घर भाड्याने घेण्याचा विचार मी करत होती. पण भाडं फार जास्त होतं. त्यामुळए मी विचार केला की स्वतःचं घर विकत घ्याव. अशा प्रकारे मुंबईत माझं पहिलं घर झालं.मुंबईत स्वतःची जागा असणं फार महत्त्वाचं आहे. लोकं तुमच्या घरी आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा असली पाहिजे आणि तुमचं मन मोठं असलं पाहिजे.असं अंकिता लोखंडे बोलताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओमध्ये अंकिता तिच्या घराबद्दल बोलताना दिसत आहे, पण अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ते घर सुंशात याचं होतं आणि ते 4BHK नसून वेग-वेगळे 2BHK फ्लॉट होते.दुसरा नेटकरी म्हणाला, मला असं वाटतं की ते घर तुझं नसून तुझ्या नवऱ्याचं आहे, एवढंच नाही तर अन्य एक नेटकरी म्हणाला, घराचे हाफ्ते सुशांत भरायचा. सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सुशांत सिंह राजपूत – अंकिता लोखंडे
‘पवित्र रिश्ता’ मालिकेत एकत्र झळकल्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा देखील होती. पण दोघांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. ब्रेकअपनंतर अंकिता हिच्या आयुष्यात उद्योजक विकी जैन याची एन्ट्री झाली. आता अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button