ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

सर्वांगीण विकास हीच यशाची गुरुकिल्ली : प्राचार्या डॉ. पी. मालती

​डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

पिंपरी | “आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंकडे लक्ष देऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधणे ही काळाची गरज आहे. हाच सर्वांगीण विकास भविष्यातील यशाचा मार्ग प्रशस्त करतो,” असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती यांनी केले.

​आकुर्डी येथील डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रमुख वित्तीय अधिकारी बिपिन बिहारी शर्मा, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत, कुलसचिव प्रशांत भालेराव, ‘स्टुडंट अफेअर्स’च्या प्रमुख डॉ. स्मिता पाटसकर, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी डॉ. हनी विल्यम्स व प्रा. आराधना चव्हाण यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा      :        सौंदर्यापेक्षा संस्कार महत्त्वाचे; व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील

​गुणवंतांचा गौरव आणि वार्षिकांकाचे प्रकाशन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे (मॅगझीन) प्रकाशनही उत्साहात पार पडले. प्रा. दिपाली चौधरी, प्रा. आरती उत्तीकर आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी हा अंक अत्यंत कल्पकतेने तयार केला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक संदेश

स्नेहसंमेलनात सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. विविध सादरीकरणांतून विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे सामाजिक संदेशही दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया प्रचंड व प्रज्वल दुधे यांनी केले, तर रियांश सहारे याने उपस्थितांचे आभार मानले.

मार्गदर्शन आणि नियोजन

​या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे चेअरमन सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त), प्राचार्या डॉ. पी. मालती आणि डॉ. स्मिता पाटसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button