Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अमृता फडणवीसांचे नवीन पंजाबी गाणं प्रदर्शित

‘आज मैं मूड बना लिया’ पार्टी सॉंग प्रदर्शित

24 तासांत 7 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं गाणं
मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन पंजाबी गाणे रिलीज झाले आहे. आज मैं मूड बना लिया असं गाण्याचे बोल आहेत. हे एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

टी सिरीजच्या या गाण्याचा टिझर 5 जानेवारी ला प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते या गाण्याची वाट पाहत होते. तसेच अमृता फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते.

अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र त्या सामाजिक क्षेत्रात असो किंवा संगीत क्षेत्रात त्या कायम चर्चेत असतात. याआधीही त्यांनी अनेक गाणी प्रदर्शित केली आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला एका दिवसात 7 लाख 20 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. हे युट्युबवर 7 व्या नंबरला ट्रेडिंग आहे. अमृता फडणवीस यांनी या पुर्वी वो तेरे प्यार का गम, शिव तांडव स्त्रोतम, तेरी मेरी फिर से, बेटिया ही गाणी प्रदर्शित केली आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button