आमिरखान आदिमानवाचा पेहराव करून रस्त्यावर चालत होता
वाढलेली दाढी, वाढलेले केस अन् फाटके कपडे
![Amirkhan, primitive man, dress, road,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/amir-780x470.jpg)
मुंबई : वाढलेले केस,दाडी, अंगावर फाटके कपडे मुंबईच्या रस्त्यावर आदिमानवासारखा फिरणाऱ्या एका माणसाने सर्वांचेच लक्ष वेधलं. रस्त्यावरील लोकं त्याला थांबून पाहत होते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा कोणी आदिमानव नाही तर तो चक्क आमिर खान आहे. होय, आमिर खानने आदिमानवाचा पेहराव करून तो रस्त्यावर चालत होता. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एका पापाराझीने हा पोस्ट केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
वाढलेली दाढी, वाढलेले केस अन् फाटके कपडे
आमिर खानचा हा अवतार इतका विचित्र होता की रस्त्यावरील कोणही त्याला ओळखू शकलं नाही. तसेच व्हिडीओमध्ये देखील आमिरला ओळखणं कठीण जात आहे. या व्हिडीओमध्ये आमिर रस्त्यावरून जोरजोरात चालताना दिसत आहे.
हेही वाचा : ‘विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला’; राज ठाकरेंकडून शंका उपस्थित
तसेच हातगाडी ढकलताना दिसत आहे एवढच नाही तर रस्त्यांवून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे तो एकटक बघत चालताना दिसत आहे. लोकही त्याला मागे वळून हा नक्की कोण माणूस आहे अशा पद्धतीने पाहत आहेत मात्र कोणीही त्याला ओळखलं नाही.
रिअॅलिस्टिक मेकअपमुळे कोणीही ओळखू शकलं नाही
आमिर खान असा वेगवेगळा लूक करून सर्वसामान्य लोकांमध्ये फिरण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने याधीही असे प्रयोग केले आहेत. पण आमिरचा या लूकचा मेकअप इतरा रिअॅलिस्टिक होता की त्याला खरंच कोणीही ओळखू शकत नाही. नेटकऱ्यांनी देखील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनाही हा खरंच आमिर आहे का असा प्रश्न पडला असणार.
आमिरच्या या व्हिडीओचं सिक्रेट अजूनही उलगडलेलं नाही
दरम्यान आमिरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्याचं प्रचंड कौतुक केलं आहे. तसेच हा आगामी चित्रपटासाठी केलेला एक स्टंट आहे का?, कोणती नवी जाहिरात केलीये का? असे अनेक प्रश्न त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी विचारले आहेत. मात्र अद्यापतरी आमिरने कोणतेही उत्तर यावर दिले नाही.आमिर खान लवकरच ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटात मात्र पाहायला मिळणार आहे. पण आमिरच्या या व्हिडीओचं सिक्रेट अजूनही उलगडलेलं नाही.