Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अकोल्यात आणखी 22 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 627

अकोला | अकोल्यातं आणखी 22 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 627 वर गेली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 151 वर गेली आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालात 12 महिला व 10 पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण रजपुतपुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथिल दोन, माळीपुरा येथील दोन, अशोकनगर अकोट फैल येथील दोन तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ, आंबेडकरनगर, शिवसेना वसाहत, जुने तारफैल, आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी, रुद्रनगर, जुनी उमरी नाका, खदान, पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.





