Snehal Rai : अभिनेत्री स्नेहल रायच्या कारचा पुण्याच्या दिशेने जाताना अपघात
![Actress Snehal Rai's car met with an accident while going towards Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/snehal-rai-accident-780x470.jpg)
Snehal Rai Car Accident : ‘इश्क का रंग सफेद’ फेम अभिनेत्री स्नेहल रायच्या गाडीचा पुण्याच्या दिशेने जात असताना अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने तिच्या कारला धडक दिली. यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीतील कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही.
अपघातानंतर ड्रायव्हर आणि स्नेहल रायला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्यानंतर अभिनेत्रीने स्वत पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र ट्रकचालक पसार झाला आहे.
हेही वाचा – शरद पवारांनी दिल्लीमधून भाकरी फिरवली; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
अचानक एक ट्रक आला आणि माझ्या कारला धडकला. माझ्या ड्रायव्हरने माझा जीव वाचवला. आम्ही पोलिसांना फोन केला आणि ते तिथे पोहोचले. बोरघाट पोलीस स्टेशनमधील योगेश भोसले यांनी खूप मदत केली. अपघातानंतर मी खूप घाबरले होते, त्यांनी मला ग्लुकोज दिले आणि आवश्यक ती मदत केली, असं अभिनेत्री स्नेहल रायने सांगितले आहे.