ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आमिर खानचे आयुष्य आणि मुत्यूवर मोठं वक्तव्य

आपण आयुष्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस असेल

मुंबई : अभिनेता आमिर खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. फक्त भारतात नाही तर, जगभरात आमिरच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून अभिनेत्याबद्दल कोणतीही गोष्ट तात्काळ चाहत्यांपर्यंच पोहोचते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आमिर खान आयुष्य आणि मत्यूवर मोठं वक्तव्य केलं आहे. कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस असेल, असं देखील आमिर खान म्हणाला. एवढंच नाही तर, अभिनेत्याने त्याच्या सिनेमांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, मी माझ्या आयुष्यात कधीच एकत्र सहा सिनेमे केले नाहीत. सिनेमा सोडण्याचा जेव्हा मी निर्णय घेतला तेव्हा मला एक विचार आला काम करण्यासाठी माझ्याकडे आता फक्त 10 वर्ष शिल्लक आहेत.

आपण आयुष्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. कदाचित उद्या माझा अखेरचा दिवस असेल माझ्याकडे आता फक्त 10 वर्षांचं आयुष्य शिल्लक आहे. मी आता 59 वर्षांचा आणि पुढच्या 10 वर्षात सत्तरी गाठेल तेव्हा पर्यंत स्वस्थ राहिल की काम करु शकेल त्यामुळे मी विचार केला आहे पूर्वीपेक्षा मला अधिक चांगलं काम करायचं आहे.

माझं वय वढतंय त्यामुळे मला मेहनती आणि टॅलेंटेड मुलांना संधी द्यायची. वयाच्या 70 व्या वर्षी निवृत्त होण्यापूर्वी, मला विश्वास असलेल्या प्रतिभावान लोकांसाठी एक व्यासपीठ तयार करायचं आहे. असं देखील अभिनेता म्हणाला.

मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा खान नसती तर मी अभिनयाचा निरोप घेतला असता, असं देखली अभिनेता म्हणाला. आमिरने 2022 साली ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटातून निवृत्ती घेण्याची योजना आखली होती.

आमिर खान याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ सिनेमाचा सिक्वलमध्ये अभिनेता सध्या व्यस्त आहे. सिनेमाच्या सिक्वलचं नाव ‘सितारे जमीन पर’ असं आहे. सिनेमात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र ‘सितारे जमीन पर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button