Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

३९ वर्षांची मैत्री अन् ‘भूतबंगल्या’त एकत्र! अक्षय कुमार अन् तब्बूच्या केमिस्ट्रीची पुन्हा चर्चा; वाचा त्यांच्या नात्याचे किस्से

Akshay Kumar Tabu Friendship : बॉलीवूडमध्ये मैत्रीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत, पण अक्षय कुमार आणि तब्बू यांची मैत्री काहीशी निराळी आणि शांत आहे. कोणत्याही वादाशिवाय आणि प्रदर्शनाशिवाय या दोघांनी गेल्या ३९ वर्षांपासून आपले नाते जपले आहे. दोघेही एकमेकांबद्दल जुने किस्से सांगत असतात. त्यापैकी काही निवडक किस्से ज्यामुळे त्यांची मैत्री कायम टिकून आहे.

अक्षय आणि तब्बू यांच्या मैत्रीची सुरुवात ९० च्या दशकात झाली. या दोघांनी पहिल्यांदा ‘हेरा फेरी’ (२०००). पण दोघांची जुनी मैत्री असल्याचे म्हटले जाते. तब्बल ३९ वर्षे. या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात तब्बूने साकारलेली ‘अनुराधा’ आणि अक्षयचा ‘राजू’ प्रेक्षकांना आजही आठवतो. या दोन दशकांहून अधिक काळामध्ये या दोघांनी एकमेकांचा चढ-उतार पाहिला आहे, पण त्यांच्या मैत्रीत कधीही अंतर पडले नाही.

अक्षय कुमार एका मुलाखतीत म्हणाला होता की, “तब्बू ही चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्यासोबत काम करताना तुम्हाला अभिनयाचा एक उत्तम अनुभव येईल.” अक्षयच्या शिस्तबद्ध कामाचं तब्बूला नेहमीच कौतुक वाटतं. तर तब्बू अक्षयबद्दल सांगते की, “अक्षय हा असा कलाकार आहे जो सेटवर कमालीची ऊर्जा घेऊन येतो. इतकी वर्ष झाली तरी तो कामाबद्दल तितकाच उत्साही आहे.”

तब्बूने एका जुन्या मुलाखतीत मजेशीरपणे म्हटले होते की, तिची आणि अक्षयची मैत्री इतकी जुनी आहे की ती त्याला कोणत्याही विषयात सल्ला विचारू शकते किंवा हक्काने बोलू शकते.

हेही वाचा –  ‘देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भूतबंगला या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी कलाकारांनी त्यांच्या लॉन्ग फ्रेंडशीपविषयीचे काही किस्से शेअर केले. अक्षय कुमारने यावेळी सांगितले की, जरी तो चित्रपटसृष्टीत गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून कार्यरत असला, तरी तब्बूशी त्याचे नाते साधारणपणे ३८ ते ३९ वर्षांपासूनचे आहे. दोघेही कलाकार मोठे ‘स्टार्स’ बनण्यापूर्वी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील एक फारशी कोणालाही माहिती नसलेली गोष्ट अक्षयने उघड केली. तो म्हणाला, “तब्बू आणि मी एकत्र डान्स अकॅडमीमध्ये नृत्याचे धडे गिरवण्यासाठी जात असू. ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती आहे.” अक्षयच्या या बोलण्यात तब्बूनेही लगेचच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, “हो, तो मला त्याच्या बाईकवरून घेऊन जायचा.”

तिने अक्षयपणे एक मुद्दा नमूद केला. ती म्हणाली की, “इतकी वर्षे लोटली असली तरीही, अक्षयची शिस्तबद्ध जीवनशैली आजही तशीच कायम आहे. तो अगदी त्याच्या तरुणपणात होता, तो आजही तसाच आजही पहाटे ४ वाजता उठतो. फिटनेस-डाएट आणि पहाटे ५ वाजता जॉगिंगला जाण्याचा आग्रह धरतो. तो आजही म्हणतो, ‘हे खाऊ नकोस किंवा ते खाऊ नकोस.’ त्याच्या या सवयींमध्ये अजिबात बदल झालेला नाही.”

प्रियदर्शन यांच्या ‘भूतबंगला’ हॉरर-कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमार, तब्बू, आसरानी, राजपाल यादव, वामिका गब्बी यांच्या भूमिका असणार आहेत. याआधी अक्षय आणि तब्बूने ‘हेरा फेरी’ आणि ‘भागम भाग’ सारख्या कॉमेडी चित्रपटात आपली छाप पाडली आहे. तब्बूने अलिकडच्या काळात ‘भूल भुलैया २’ मध्ये केलेल्या अभिनयानंतर आता ती अक्षयसोबत या हॉरर-कॉमेडीत काय नवीन करणार, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

बॉलीवूडच्या झगमगाटात नाती टिकवणं कठीण असतं, पण अक्षय आणि तब्बूने आपलं वैयक्तिक आयुष्य आणि काम याची गल्लत कधीच होऊ दिली नाही. सेटवर होणाऱ्या गप्पांपासून ते एकमेकांच्या कामाचं कौतुक करण्यापर्यंत या दोघांनीही एक ‘मॅच्युअर’ मैत्री जपली आहे.

वरील कलाकारांशिवाय भूतबंगला चित्रपटात परेश रावल, मिथिला पालकर, जिष्णू सेनगुप्ता, राजेश शर्मा या कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button