सुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत
सध्या आपल्या रिलेशनशीपमुळे माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन चर्चेत आहे. ती तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी लहान असलेल्या रोमनसोबत नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिल्पा शेट्टीच्या घरी दिवाळी निमित्त आयोजित खास पार्टीमध्ये सुष्मिता रोमनसोबत आली होती.
एकमेकांसोबत दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे. आपल्या बिनधास्त अंदाजात सुष्मिता नेहमीच पाहायला मिळते. या दोघांचे ताज महालाजवळील फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुष्मिताने या फोटोला शेअर करत ‘लव्ह ऑफ माय लाईफ’, असे कॅप्शन दिले होते. तेव्हापासून तिच्या आणि रोमनच्या नात्यावर चर्चा सुरू झाली आहे.
तिच्या आणि रोमनच्या वयातील फरक पाहता या दोघात तब्बल 15 वर्षांचा फरक आहे. सुष्मिता 42 वर्षांची आहे, तर
रोमन हा 27 वर्षांचा आहे. पण म्हणतात ना, प्रेमात वयाचे बंधन नसते, याच उक्तीप्रमाणे या दोघांचेही नाते बहरताना दिसत आहे. प्रियांका आणि निकच्या वयामध्येही अंतर आहे. निक प्रियांकापेक्षा वयाने बराच लहान आहे. अभिषेकही ऐश्वर्यापेक्षा लहानच आहे. त्यामुळे हा ट्रेन्ड काही नवीन आहे, असे म्हणता येणार नाही.