सपना चौधरी दिसणार ऍक्शनपॅक्ड रोलमध्ये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/sapna-choudhari-.jpg)
सपना चौधरीला आतापर्यंत भोजपुरी, हरियाणवी, पंजाबी सिनेमांमध्ये डान्स करतानाच बघितले गेले आहे. मात्र आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमामध्ये तिला चक्क ऍक्शनपॅक्ड रोल करायची संधी मिळाली आहे. “दोस्ती के साईड इफेक्ट्स’या तिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
त्यामध्ये सपना हातात रिव्होल्व्हर घेऊन दनादन गोळ्या झाडताना आणि गुंडांची धुलाई करताना दिसते आहे. या सिनेमाचे डायरेक्शन हादी अली अबरार यांनी केले आहे. ही चार मित्रांची कहाणी आहे. त्या प्रत्येकाचे काही तरी एक स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात.
यापूर्वी सपनाने बॉलिवूडमध्ये दोन गाणी केली आहेत. “वीरे दी वेडिंग’ आणि “नानू की जानू’मध्ये स्पेशल परफॉर्मन्स केला होता. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. मात्र सपनाच्या गाण्यांना मात्र खूप प्रसिद्धी मिळाली होती. याशिवाय “बिग बॉस 11’मुळे सपनाला खूप प्रसिद्धी मिळाली होती. देशभर मिळालेल्या या प्रसिद्धीच्या जोरावरच सपना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सिद्ध झाली आहे.