breaking-newsमनोरंजन
विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा ‘हा’ खास फोटो
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय कर्णधार विराट कोहली ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेक वेळा हे दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यामुळेच ही जोडी सर्वाधिक चर्चेत येत असते. अलीकडेच या दोघांनी ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स इव्हेंट’मध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील काही फोटो विराटने सोशल मीडियावर शेअर केले असून त्यातील या दोघांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमामध्ये विराट आणि अनुष्का दोघंही स्टायलिश अंदाजामध्ये पाहायला मिळाले. यावेळी विराटने पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. तर अनुष्काने ब्लॅक हाइ-वेस्टेड पॅण्टसोबत क्रॉप टॉप घातला होता. सध्या त्यांचा हा फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.