Breaking-newsमनोरंजनमहाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त बिग बींकडून लतादीदींना मराठीत शुभेच्छा

महाईन्यूज | प्रतीनिधी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनीदेखील लतादीदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. अमिताभ यांनी ट्विटरवर एक दीर्घ व्हिडीओ शेअर केला असून मराठीमध्ये लतादीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच पसायदानातील दोन ओळीही गायल्या.

‘आयुष्यामध्ये काही नाती अशी असतात, ज्यांचा कधीच हिशोब होत नाही किंवा व्यवहारही होत नाही. त्यामुळे अशा नात्यांची व्याख्या करता येत नाही. या नात्यात असतो तो केवळ आदर, प्रेम आणि सन्मान. असंच एक नातं लताजींसोबत आहे’, असं बिग बी म्हणाले.

कविता, गाणी, साहित्य यांचा एकमेकांशी अप्रत्यक्षपणे कसा संबंध आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ज्यावेळी ते नैराश्यात किंवा चिंतेत असतात. त्यावेळी त्यांना संगीत, साहित्य यांचा कसा फायदा झाला हेदेखील त्यांनी सांगितलं. सोबतच लतादीदी जेव्हा एखादं गाणं म्हणतात, त्यावेळी त्यांच्या प्रत्येक आलापमधून सर्व देवींच्या मूर्ती, कविता,पुस्तकं जीवंत झाल्याचा भास होतो, असंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button