Breaking-newsमनोरंजन
…म्हणून सोनमला नकोय वडिलांसारखा पती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/anil-kapoor-sonam.jpg)
प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांची खूपच लाडकी असते. यामुळे पतीही असाच असावा, असे तिला वाटणे साहजिकच आहे. मात्र, अभिनेत्री सोनम कपूर याला अपवाद आहे.
सोनम म्हणते, मी स्वतः आपल्या वडिलांसारखी आहे. यामुळे मला असे वाटते की, माझा पती माझ्या वडिलांसारखा नसावा. 2012 मध्ये सोनम कपूर बॉलिवूडची अभिनेत्री सिम्मी गिरेवालच्या एका टॉक शो मध्ये गेली होती, तेव्हा तिने आपली ही इच्छा व्यक्त केली होती. अनिल कपूर लहान मुलांसारखे वागतात, यामुळे आईला त्यांची सतत चिंता असते, असेही ती म्हणाली होती.