मृत्यूच्या अफवांवर मुमताज यांची प्रतिक्रिया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG_20200523_164341.jpg)
मुंबई : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे मुमताज. सध्या मुमताज विषयी सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. या चर्चेमागे कारण देखील फार मोठं आहे. सोशल मीडियावर मुमताज यांच्या मृत्यूची अफवा जोर धरत आहे. त्यामुळे खुद्द मुमताज यांनी या अफवांना पूर्णविराम दिलं आहे. माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा ते गुपित नसेल,असं त्या म्हणाल्या. मुमताज यांची मुलगी तान्या माधवनीने आपल्या आईची खुशाली सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना कळवली आहे.
तान्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुमताज यांचे आरोग्य स्थिर असल्याचे दिसून येत आहे. ‘मी माझ्या सर्व चाहत्यांवर खूप प्रेम करते. माझा मृत्यू झालेला नाही. मी जिवंत आहे. लोक बोलत आहेत तेवढी वृद्ध मी अद्याप झालेली नाही. तुमच्या प्रार्थनांमुळे मी अजूनही छान दिसत आहे.’ असं मुमताज या व्हिडिओमध्ये बोलत आहेत.
सांगायचं झाल तर, मुमताज ७३ वर्षांच्या आहेत. सध्या त्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. मुमताज यांचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो फार वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. आता त्या उत्तम आयुष्य जगत आहेत