“माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून या सर्व कारस्थानामागे सरोज खान यांचा हात” – गणेश आचार्य

दिव्या कोटीयन नावाच्या कोरिओग्राफरने गणेश आचार्य यांच्यावर इतर दोन मुलींकडून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. यावर आचार्य यांनी ही प्रतिक्रिया देत प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे … तसेच या सर्व कारस्थानामागे ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान आणि त्यांचे सहकारी असल्याचा आरोप केला आहे. .
गणेश आचार्य म्हणाले, “दिव्या कोण आहे हे मला माहिती नाही. मी तिच्यासोबत काम केलेलं नाही. ती डान्स मास्टर्स असोसिएशनमध्ये असिस्टंट होती हे मला माहिती आहे. तिने डान्स मास्टर्स असोसिएशनच्या लोकांविरुद्ध तक्रार केली आहे. मी तिथं जनरल सेक्रेटरी आहे. तिच्या त्या गोष्टीवरुन तिचं कार्ड रद्द केलं आहे. त्यानंतर ती हसत हसत आपलं कार्ड घेऊन गेली आहे.”

26 जानेवारीला संबंधित ठिकाणावर मी कामासाठी आलो. तेथे ती बाहेर उभी होती. मला तेथील काम आटोपून पुढे यायचं होतं. मी त्यासाठी निघून आलो. त्यानंतर तेथे काय झालं हे मला माहिती नाही. तिने जे आरोप केले ते का केले हे मला कळत नाही, असंही गणेशा आचार्य म्हणाले.

पीडित तरुणीने गणेश आचार्य यांच्यावर ऑफिसमध्ये बोलावून पॉर्न व्हिडीओ पाहायला सांगितल्याचेही गंभीर आरोप केले आहेत. पॉर्न व्हिडीओ पाहण्यास नकार दिल्यावर गणेश आचार्य भडकले. त्यांनी काम करु दिलं नाही आणि युनिअनमधून काढलं, असाही आरोप गणेश आचार्य यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांवर गणेश आचार्य म्हणाले, “असं तर कुणीही येऊन बोलेल. असे 10 जण उभे राहतील. मी तिच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. मी तिला कोर्टात खेचेल.”गणेश आचार्य यांनी या आरोपांमागे ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान आणि त्यांचे सहकारी असल्याचा आरोप केला आहे.

मात्र दिव्यानेही त्याच्यावर खटला दाखल केला. महाराष्ट्र महिला आयोग आणि आंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली गेली. दिव्या 33 वर्षीय महिला कोरिओग्राफर आहे.





