breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा
मुंबई | ‘राम सिया के लव कुश’ फेम अभिनेता शाहबाज खानविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप शाहबाज खानवर आहे.
या प्रकरणी मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहबाज खान यांनी चंद्रकांता, युग, अफसर बिटिया, कर्मफल दाता शनि, द ग्रेट मराठा सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकतेच ते ‘तेनाली रामा’, ‘राम सिया के लव कुश’ आणि ‘दास्तान-ए-मोहोब्बत सलीम अनारकली’ या मालिकांमध्ये झळकले.