breaking-newsमनोरंजन

परिणीती निघाली ‘हैदराबादला’, सायनाच्या घरी करणार मुक्काम

हैदराबाद – भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा ही सायना नेहवालची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. आता ती सायना नेहवालच्या घरी हैदराबादला मुक्काम करणार आहे. सायनाची भूमिका साकारताना कोणतीच कसूर राहणार नाही याची खबरदारी ती घेत आहे. यासाठी तिने सायनाच्या घरी राहून भूमिकेची तयारी करण्याचे ठरवले आहे.

परिणीतीने सांगितलय की, ”मला सायना बनायचे आहे. यासाठी तिच्या घरी जाऊन ती कशी राहते हे मला पाहायचे आहे. मी तिला अनेकवेळा भेटली आहे. परंतु यावेळी मी तिच्या घरी जाणार आहे, तिच्यासारखे राहणार आहे आणि त्यांच्यासारखेच मला जेवायचे आहे. तिने मला हे वचन दिलय की तिची आई मला तेच जेवण देईल जे ती खात असते. त्यामुळे मी तिच्या घरी जाण्यासाठी उत्सुक झाली आहे.”

बायोपिकमध्ये काम करणारे कलाकार आपल्या भूमिकेसाठी खास तयारी करत असतात. सायना नेहवालच्या बायोपिकचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहेत. टी-सीरीज प्रॉडक्नच्यावतीने या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button