Breaking-newsमनोरंजन

‘ब्रेकअप’नंतर रविनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न…

रविना टंडन बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. रविनाने एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. गेल्या काही काळापासून रविना अभिनयापासून काहीशी दूर असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र, ती कायमच चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. अलिकडेच रविनाने आपला ४५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने रविनाचा एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आहे.

सध्या रविना आपल्या वैवाहिक जीवनात मग्न आहे. परंतु ९०च्या दशकात तिचं नाव तक्तालीन सुपरस्टार अजय देवगनबरोबर जोडलं गेलं होतं. त्यावेळी रविना अजयच्या प्रेमाच्या आकंठ बुडाली होती. परंतु काही कारणास्तव ते नातं दिर्घ काळ टिकू शकलं नाही. त्यावेळी अचानक झालेल्या ब्रेकअपमुळे तिने आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता अशी माध्यमात चर्चा होती. त्यानंतर तिचं नाव अक्षय कुमार बरोबर जोडलं गेलं त्यामुळे अजय बरोबरचे तिचे किस्से हळूहळू चर्चेतून नाहीसे झाले. परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आत्महत्येचा किस्सा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button