Breaking-newsमनोरंजन

धक्कादायक! प्रसिद्ध गायकाची गोळ्या घालून हत्या

प्रसिद्ध पॉप सिंगर पॉप स्मोक याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशानं २० पॉप स्मोकच्या घरात शिरला आणि त्याने पॉपची गोळ्या घालून हत्या केली आहे. २० वर्षीय ‘पॉप स्मोक’ अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. लॉस एंजेलिस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पॉप संध्याकाळी साडेचार वाजता रेडिओवरील शो संपवून घरी आला होता.

घरी येताच तो आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेला. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती त्याच्या खोलीत चोरी करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्या चोराने पॉपवर गोळ्या झाडल्या. परिणामी राहत्या घरीच त्याचा मृत्यू झाला. पॉपचा मृत्यू झाला त्यावेळी त्याचे कुटुंबीय घरातच होते. परंतु पॉपच्या खोलीतील भिंती ध्वनीप्रतिरोधक असल्यामुळे त्याच्या ओरडण्याचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पॉपची आई त्याला नाश्ता करण्यासाठी बोलवण्यास गेली. त्यावेळी पॉप मृतावस्थेत आढळून आला. आरोपीनं तोंडावर मास्क घातला होता. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा चेहरा दिसू शकला नाही. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button