Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
दीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअप ग्रुपची अॅडमिन

मुंबई | ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे. एनसीबीने दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.
२०१७ चे ‘ते ‘ व्हॉट्सअप चॅट झाले होते अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचंही समोर येत आहे.





