“दबंग 3’मध्ये चार नवीन चेहरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/dabangg-3-.jpg)
सलमानचा “दबंग 3′ 20 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. सलमान नेहमीच आपल्या सिनेमांमधून नवीन चेहऱ्यांना संधी देत असतो. आता “दबंग 3’मधूूनही चार नवीन चेहरे लॉंच केले जाणार आहेत. त्यातील पहिला चेहरा म्हणजे सई मांजरेकर. डायरेक्टर आणि ऍक्टर महेश मांजरेकरची मुलगी सई “दबंग 3’च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.
सिनेमात तिचे नाव खुशी असेल आणि सिनेमाच्या कथेमध्ये तिचा रोल महत्वाचा असेल. किच्छा सुदीप हा दक्षिणात्य सिनेमांमधील ऍक्शन हिरोदेखील “दबंग 3’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. या सिनेमात तो व्हिलनचा रोल साकारतो आहे. त्याच्यात आणि सलमानमध्ये काही जबरदस्त ऍक्शन सीन असणार आहेत.
याशिवाय सलमानच्या वडिलांच्या रोलमध्ये विनोद खन्ना यांचे बंधू प्रमोद खन्ना असणार आहेत. “दबंग’च्या पहिल्या भागात सलमान म्हणजेच चुलबुल पांडेच्या वडिलांच रोल विनोद खन्ना यांनी केला होता. आता त्या रोलची जबाबदारी प्रमोद खन्ना यांच्यावर आहे. “दबंग’मध्ये “मुन्नी बदनाम हुई’हे आयटम सॉंग होते, तसेच “दबंग 3′ मध्ये “मुन्नी….’ या गाण्याच्या नव्या आवृत्तीचे गाणे असेल. “मुन्ना बदनाम हुआ’ या गाण्यासाठी वरीना हुसैन ही नवी ऍक्ट्रेस दिसणार आहे.