Breaking-newsमनोरंजन

ताहिरा कश्यपने सुरु केली ऑनलाइन सीरिज

मुंबई. अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी आणि लेखिका ताहिरा कश्यप सध्या कथा लिहिण्यात व्यग्र आहे. तिने इंस्टाग्रामवर एक कथेची सुरुवात केली. ज्याचे नाव ‘लॉकडाउन टेल्स’आहे. याविषयी ताहिरा सांगते, आतापर्यंत मी तीन ते चार कथा लिहिल्या आहेत. या कथा वास्तविक जीवन आणि माझ्या कल्पनेवर आधारित आहेत. माझा सर्वात जास्त वेळ कथा रेकॉर्ड करण्यात जात आहे.

ताहिरा म्हणाली,स्क्रीनप्लेवरदेखील मी काम करत आहे. याबरोबरच पुस्तक लिहिण्याचे कामही सुरू आहे. लवकरच मी माझे पुस्तक रिलीज करणार आहे. कामासोबतच मी सध्या कुटुंब आणि आयुष्मानसोबत वेळ घालवत आहे. असे काही होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. काहीतरी वेगळे करण्याचा मी विचार करत आहे. जेणेकरून त्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button