Breaking-newsमनोरंजन

“टॉयलेट 2’सह पुन्हा येत आहे अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमारचा “टॉयलेट – एक प्रेमकथा’ या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता “टॉयलेट 2′ हा चित्रपट घेऊन येत आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर दुसऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. “टॉयलेट 2. यावेळी संपूर्ण देश बदलेल. लवकरच येत आहे’, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

Akshay Kumar

@akshaykumar

Time to get ready for the next Blockbuster – Mission ! Iss baar badlega poora desh!
Coming soon.

यासोबत अक्षयने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, टॉयलेट तर बनवले पण कथा अजून बाकी आहे. मी लवकरच घेऊन येत आहे टॉयलेट’ 2. अक्षयने चित्रपटाबाबतचा अधिक तपशील सांगितलेला नाही.

“टॉयलेट- एक प्रेमकथा’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वच्छ भारत अभियाना’चा भाग म्हणून बनवण्यात आला होता. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नारायण सिंग यांनी केले होते.

नीरज पांडे याचे निर्माते होते. हा चित्रपट युरोपमधील 22 देशामध्ये प्रदर्शित झाला होता. जपान आणि माल्टासारख्या देशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर सामाजिक संदेश देणा-या “पॅडमॅन’ चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button