Breaking-newsमनोरंजन

करिनाने ट्रोल करणाऱ्यांना ‘असे’ दिले सडेतोड उत्तर…

अभिनेत्री करिना कपूरने तैमूरच्या जन्मानंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असणाऱ्या करिनाचा जिममधून बाहेर पडतानाचा एक फोटो व्हायरल झाला आणि या कपड्यांवरुन काही नेटक-यांनी तिला ट्रोल केले. मात्र याला एका मुलाखतीत करिनाने चांगलेच उत्तर दिले आहे.

 

‘करिना आता आई असल्यामुळे तिने योग्य कपड्यांची निवड केली पाहिजे’, असा सल्ला तिला काही जणांनी दिला. यावर करिना म्हणते, ”प्रत्येक व्यक्तिने त्याच्या व्यक्तीमत्वाला शोभतील असेच कपडे वापरावेत. आई आहे म्हणून साडीच घालायची हा कोणता नियम नाही. माझ्या घरात सर्वच महिला मॉर्डन,पाश्‍चात्य कपडे वापरतात. माझी आई बबिता असो किंवा माझी सासू शर्मिला टागोर या दोघीदेखील पाश्‍चात्य कपडे घालतात. माझी आई जीन्स-टॉपमध्ये खूपच सुंदर दिसते. तसेच माझ्या सासूबाई साडीमध्ये जेवढ्या छान दिसतात तेवढ्याच सुंदर त्या जीन्समध्येदेखील दिसतात, असे ती म्हणाली.

ऐवढ बोलून शांत बसेल ती करिना कशी? ती अजून पुढे म्हणाली की, जेथे महिलांवर कोणतीच सक्ती नसते, अशा घरात माझा जन्म झाला आहे. घरातल्या महिला तेच कपडे घालतात जे घालण्याची त्यांची इच्छा असते. जर तुम्हाला तुमच्या व्यक्तीमत्वावर विश्वास असेल तर तुम्ही तुम्हाला शोभतील असे कोणतेही कपडे घालू शकता, असेही ती म्हणाली. करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button