कमल हसनच्या ‘इंडियन 2’ या चित्रपटच्या सेटवर भिषण अपघात,तीन जणांचा मृत्यू …
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/११११.png)
सुपरस्टार कमल हसनच्या ‘इंडियन 2’ या चित्रपटच्या सेटवर झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे… या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी म्हणजे 19 फेब्रुवारीला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रेनमध्ये काम करणार कामगार खाली पडले. अपघात ईवीपी फिल्म सिटीजवळ झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहे.
एएनआयच्या माहितीनुसार अपघातात, चित्रपटाचे डायरेक्टर शंकर यांचे पर्सनल डायरेक्टर मधु , असिस्टंट डायरेक्टर कृष्णा आणि एक स्टाफर चंद्रन यांचा मृत्यू झाला आहे.
एस शंकर द्वारा निर्देशित ‘इंडियन 2’ चित्रपटात अभिनेता कमल हासन मुख्य भूमिकेत आहे. सुपरहिट चित्रपट ‘इंडियन’ या चित्रपटाचा ‘इंडियन 2’ हा सीक्वल आहे. कमल हासन हे सुखरुप आहेत तर इतर 10 जण जखमी झाले आहेत अशी माहिती समजत आहे. हा अपघात सब अर्बन नाजरपेटमध्ये झाला. क्रेन चालवणारा कर्मचारी ती सरळ उभी करण्याचा प्रयत्न करत होता मात्र ती कोसळली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1-12.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-40.png)
“मी इस्पितळातील अपघात रुग्णांना पाहत असलेल्या डॉक्टरांशी बोललो आहे.त्या रुग्णांना
प्रथमोपचार प्रदान केले जाते..त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत… आशा आहे ते लवकर बरे होतील”…
अभिनेता कमल हसन यांनी ट्वीट करत अपघातात मृत्यू झालेल्यांविषयी शोक व्यक्त केला आहे. जखमींना रूग्णालयात भेटल्यानंतर कमल हसन म्हणाले, रूग्णांवर प्राथमिक उपचार सुरू असून ते लवकर बरे होतील.