ऋषी कपूर यांचा चाहत्यांसाठी एक नवा टास्क…ओळखून दाखवायला सांगितला स्त्री वेशातील ‘हा’ अभिनेता…

अभिनेता ऋषी कपूर यांनी आपल्या चाहत्यांना एक नवा टास्क दिलाय. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला यांची थ्रोबॅक छायाचित्रे शेअर केल्यानंतर आज आणखी एक असंच छायाचित्र त्यांनी शेअर केलं आहे. छायाचित्रात एक सुंदर महिला दिसत आहे. ही जुन्या जमान्यातील अभिनेत्री नव्हे तर चक्क एक अभिनेता आहे. ज्याला ओळखणं खरंच मुश्किल आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या फॅन्सना हे छायाचित्र ओळखण्यासाठी ५० चान्स दिले होते. त्यानंतर ते स्वत:हा नाव जाहीर करणार होते. पण तत्पूर्वीच एका फॅनने हे छायाचित्र ओळखलं.

छायाचित्रात अभिनेत्री नव्हे तर एक प्रसिद्ध अभिनेता आहे. या अभिनेत्याचं नाव आहे प्राण! तो फोटो ओळखणाऱ्या त्या चाहत्यानं त्या फोटोविषयीची माहितीही दिली.


त्याने लिहिलंय, ‘हे प्राण आहेत. त्यावेळी त्यांचं लग्न झालं नव्हतं. खरंतर हे लग्नातलंच छायाचित्र आहे. प्राण यांच्या भावाच्या लग्नात त्यांनी हा गेट अप केला होता. आपल्या नव्या वहिनीची फिरकी घेण्यासाठी आपण भावाची गर्लफ्रेंड असल्याचं सांगायला प्राण यांनी हा गेट अप केला होता.’ प्राण हे पूर्वी शिमला येथील स्थानिक रामलीला मध्ये सीतेचं पात्रही साकारायचे.

फोटो नीट पाहिला तर त्यात खाली कुमारी प्राण असं लिहिलेलंही दिसतं. प्राण यांनी सुमारे सहा दशकं हिंदी सिनेमासृष्टीवर राज्य केलं. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

प्राण यांनी साकारलेले व्हिलन पाहून अनेकांना घाम फुटायचा

२०१३ मध्ये त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.





