breaking-newsमनोरंजन

इरफान खान इतक्यात मायदेशी परतणार नाही

अभिनेता इरफान खान गेले काही महिने दुर्धर आजाराशी लढत आहे. त्याच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी ही आहे की त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत मात्र तो भारतात इतक्यात परतण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मी कधी परतेन मलाच माहीत नाही,’ असे त्याने एका मुलाखती दरम्यान म्हटले आहे.

‘मी कधी परतणार याविषयी मला काहीच कल्पना नाही. या उपचारांचे परिणाम जाणून घ्यायचीही मला अजिबात घाई नाही,’ असं तो म्हणाला. कारवाँसह इरफानचा ‘पझल’ हा हॉलिवूड सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चाहत्यांना या दोन्ही सिनेमांची प्रतीक्षा आहे.

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना इरफान खानला ‘न्यूरोएंडोक्राइन’ नामक दुर्धर कर्करोगाने ग्रासलं. त्याच्यावर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. तो आपल्या तब्येतीविषयीची माहिती त्याच्या चाहत्यांना टि्वटर हँडलद्वारे देत असतो. त्याचा ‘कारवाँ’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनची अवघड जबाबदारीही इरफानअभावी या सिनेमातल्या नवोदित कलाकारांवर येऊन ठेपली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button