“आंखे 2’ची तयारी सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/aankhen-2-696x348.jpg)
सुष्मिता सेनने तीन आंधळ्यांना बॅंक लुटण्याचे ट्रेनिंग दिलेल्या “आंखे’चा सिक्वेलही लवकरच येतो आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित पहिल्या “आंखे’मध्ये सुष्मिताबरोबर अर्जुन रामपाल, अक्षय कुमार, परेश रावल आणि अमिताभ बच्चन होते. आता त्याच्या 16 वर्षांनंतर येणाऱ्या “आंखे 2’मध्येही अमिताभ बच्चन मुख्य रोलमध्ये असणार आहेत. त्यांच्यासमवेत अनिल कपूर, अर्जुन रामपाल, अर्शद वारसी, इलियाना डिक्रूझही असणार आहे, अशी चर्चा आहे. याशिवाय या सिक्वेलमध्ये दक्षिणात्य अभिनेत्री रेजिना केसेंड्राही असणार आहे, असे समजते आहे.
एवढेच नव्हे तर सुशांत सिंह राजपूत आणि विकी कौशल हे देखील यामध्ये असण्याची शक्यता आहे. एवढी स्टारकास्ट असल्यानंतर आणखी कलाकारांची खरे तर आवश्यकताच नाही. पण हॉलिवूड स्टार जॅकी चॅनही यामध्ये असण्याचे ऐकिवात आले आहे. आता तर कुठे “आंखे 2’ची स्क्रीप्ट लिहून पूर्ण झाली आहे. पुढील वर्षी त्याच्या शुटिंगला सुरुवात होईल. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये 2020 पूर्वी “आंखे 2′ रिलीज होणार नाही, हे नक्की. अनीस बज्मी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांना घेऊन सिनेमा करणार आहेत. पहिल्या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन हे एका बॅंकेतून बडतर्फ केलेले अधिकारी होते. त्याच रोलमध्ये बच्चन पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.