Breaking-newsमनोरंजन

असं पार पडलं ‘दीप-वीर’चं तिसरं वेडिंग रिसेप्शन

इटलीतील लेक कोमा येथे डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या दीप-वीरचं तिसरं आणि शेवटचं वेडिंग रिसेप्शन नुकतंच पार पडलं. मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. हे रिसेप्शन खास बॉलिवूडकरांसाठी आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडचे ‘बाजीराव -मस्तानी’ अर्थात दीपिका-रणवीर एका खास लूकमध्ये समोर आले.

डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य दिल्यानंतर दीप-वीरने मुंबई आणि बेंगळुरु अशा ठिकाणी तीन रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यातील एक रिसेप्शन बेंगळुरुमध्ये पार पडलं. तर उर्वरित दोन मुंबईमध्ये संपन्न झाले. काही दिवसापूर्वीच दीप-वीरने मुंबईत नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर त्यांचं तिसरं रिसेप्शनही पार पडलं. या तिसऱ्या आणि अखेरच्या पार्टीमध्ये दीप-वीरचा अनोखा अंदाज पाहण्यासारखा होता. दीपिकाने यावेळी लाल रंगाचा गाऊन घातला होता. तर रणवीरनेही काळ्या रंगाचा फॉर्मल ड्रेस परिधान केला होता.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Deepika Padukone and Ranveer Singh at their wedding reception in Mumbai

187 people are talking about this

या पार्टीमध्ये दिग्गज कलाकारांपासून ते नवोदित कलाकारांपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे दीप-वीरने यावेळी उपस्थित असलेल्या कॅमेरामन्ससोबतही फोटो काढल्याचं पाहायला मिळलं.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या रिसेप्शन पार्टीमध्येही दीपिका-रणवीरचा रॉयल लूक पाहायला मिळाला होता.  या वेडिंग रिसेप्शनसाठी दीपिकाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला लेहंगा घातला होता.  दीपिकासाठी या दोन्ही डिझायनरनं खास मोती, सफेद आणि सोनेरी छटा असलेला चिकनकारी लेहंगा तयार करून घेतला होता. त्यामुळे तिच्या या लेहंग्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button