Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिनेत्री शामना कासिमला ब्लॅकमेल करणाऱ्यास अखेर अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/kashim.jpg)
तिरुवनंतपुरम | अभिनेत्री शामना कासिमला ब्लॅकमेल करणे आणि तिच्याकडे पैसे मागितल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मुख्य आरोपी मुहम्मद शरीफच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्याला पलक्कड जिल्हा चौकशीतून अटक केली.
केरळ पोलिसांनी बुधवारी चार जणांना अटक केली आहे. होय, या चौघांवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले, हे चार आरोपी दक्षिण भारतीय अभिनेत्री शामना कासिमला धमकावत होते आणि त्याच्याकडे पैशाची मागणी करीत होते. त्याचवेळी या प्रकरणात कासिमच्या वडिलांनी पोलिसात धमकी देऊन तसेच खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणात असे सांगितले गेले आहे की एका व्यक्तीने अभिनेत्रीच्या वडिलांना बोलावून लग्नाचा प्रस्ताव दिला. त्याचवेळी कॉलरने म्हटले होते की ‘मुलगा दुबईत व्यवसाय करतो आणि त्याचे कुटुंब केरळचे आहे’.