दीपिकाचा ड्रेस पाहून नेटक-यांनाही पडला प्रश्न…असा कसा ड्रेस ?…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण दमदार चित्रपटांसोबत तिच्या करिअरचा ग्राफ वेगाने पार करतेय… दीपिका सध्या तिच्या ड्रेसवरून सारखीच ट्रोल होतेय.ताही ती तिच्या एका ड्रेसमुळे पुन्हा ट्रोल झालीये….

दीपिका पादुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे अनेक फोटो शेअर केले आणि या फोटोतील तिचा अवतार पाहून लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. या फोटोद्वारे दीपिका Balmain या नावाचा एक फ्रेंच ब्रँड प्रमोट करतेय. बलमा…बलमा… फॅशन का है ये बलमा… असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले.

या फोटोत दीपिकाने ब्लॅक पँटसूट व ब्जेजर घातलेला दिसतोय. सोबत ब्लॅक कलरच्या हाय हिल्स आणि डोक्यावर पदर असा तिचा अवतार आहे. काही लोकांना तिचा हा अवतार आवडला. पण अनेकांना मात्र तो जराही आवडला नाही. मग काय,युजर्सनी दीपिकाचा चांगलाच क्लास घेतला.

‘बिल्कुल भी बात नहीं बन रही’, असे एका युजरने तिच्या या फोटोवर कमेंट करताना लिहिले. तर एकाने तिच्या या फॅशन सेन्सला ‘डिजास्टर’ असे नाव दिले. ‘तुझी ही डिजास्टर फॅशनची निवड पाहून मी केवळ इतकेच म्हणू शकतो की, फॅशन आणि काहीही उचलले अन् घातले यात फरक असतो,’ असे या युजरने लिहिले.





