breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

इंग्लंडला २०१९ सालचा विश्वचषक जिंकून देणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती

इंग्लंड संघाच्या दिग्गज खेळाडूची सर्व प्रकारातून निवृत्ती

Eoin Morgan : इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू इऑन मॉर्गनने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने इंग्लंड संघाला २०१९ सालचा विश्वचषक जिंकून दिला होता. विश्वचषक स्पर्धेत मॉर्गनने इंग्लंड संघाचे नेतृत्व केलं होतं.

इंग्लंड संघाचा फलंदाज इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटपासून दूर होण्याची हीच खरी वेळ आहे, असं त्याने म्हटलं आहे. इऑन मॉर्गनचे क्रिकेटमधील करियर १६ वर्षाचे राहिले आहे. मॉर्गनने एकदिवसीय क्रिकेटसाठी इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केलं आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने पहिल्यांदाच २०१९ सालचा विश्वचषक जिंकला.

मॉर्गनने १२६ एकदिवसीय सामने इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केलं आहे. यापैकी ७६ सामन्यांत इंग्लंड संघ विजयी झाला आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये एकूण २५८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १४ शतके आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ७७०१ धावा केल्या आहेत. मॉर्गनने १६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने दोन शतक करत एकूण ७०० धावा केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button