breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

जी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे ‘भारत’ नावाचीच पाटी!

नवी दिल्ली : मोदी सरकार इंडिया नाव वगळून ‘भारत’ नाव फक्त कायम ठेवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, दिल्लीत G-20 शिखर परिषदेला अखेर सुरूवात झाली. जगभरातले नेते यासाठी दिल्लीतल्या प्रगती मैदानमध्ये नव्याने बांधलेल्या ‘भारत मंडपम्’ मध्ये दाखल झाले, तेव्हा मोदींनी त्यांचं स्वागत केलं. यानंतर झालेल्या उद्धाटनपर भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टेबलवर ठेवलेल्या पाटीवर देशाचं नाव ‘BHARAT’ असं लिहिण्यात आलंय.

यापुढे G20 ला G21 म्हटले जाईल. आफ्रिकन यूनियनला स्थायी सदस्यत्व देण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 च्या मंचावर याबाबतची घोषणा करण्यात आली. भारतात होणाऱ्या G-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. आफ्रिकन युनियन आता या आंतरराष्ट्रीय समूहाचा कायमस्वरूपी सदस्य बनणार आहे. युरोपीय युनियन पाठोपाठ आता आफ्रिकन युनियन पण G-20 समूहाचा भाग बनणार आहे. त्यामुळे यापुढे G-20 ला G-21 म्हटले जाईल.

हेही वाचा – ‘मागासवर्गीय आयोग पुन्हा स्थापन केल्यास मराठा आरक्षण टिकेल’; संभाजीराजे छत्रपती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले. ते म्हणाले, अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने जगला संदेश दिला होता. ‘मानवतेचं कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केलं जायला हवं’ या संदेशाला आठवून G-20 परिषदेला सुरुवात करुयात. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे. कोरोना महामारीवेळी जगावर मोठं संकट आले होते, त्यावेळी विश्वासाचा अभाव असल्याचे जाणवलं. पण अविश्वासाला आता विश्वासाने जिंकायचे आहे.

आपण कोरोनाला हरवू शकतो, तर अविश्वासाच्या संकटालाही हरवू शकतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सर्वांनी मिळून ग्लोबल ट्रस्ट डेफिसिटला विश्वासात बदलूयात. सर्वांना सोबत घेऊन चालायची ही वेळ आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. भारताचे G20 अध्यक्षपद हे देशामध्ये आणि देशाबाहेर सर्वसमावेशाच्या सबका साथचे प्रतीक बनले आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button