breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

इंजिनीयर-पदवीधर झाले चोर: पिंपरी चिंचवड पोलिसांची दमदार कामगिरी, उच्चशिक्षित आरोपींकडून कोट्यावधींचा माल जप्त

पिंपरी |

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहन चोरी आणि फसवणूक करणाऱ्याना टोळीतील आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीत उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कोट्यांवधीचा मालही जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी आणि चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये उच्चशिक्षित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पकडलेल्या आरोपीपैकी आकाश बधे हा कंप्यूटर इंजिनियर असून बँगलोर येथे मिलिटरी भरतीमध्ये सिलेक्शन झाले आहे. त्याचबरोअबर विलास मोरे याने BA ची डिग्री घेतली आहे . अक्षय जाधवने आयटीआय केले असून मोटार मेकँनिकचे शिक्षण घेतले आहे. तसेच, आरोपींपैकी कल्पेश पंगेकर आणि मंगेश सहानी हे देखील पदवीधर आहेत. खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या वाहन चोरांच्या टोळीला पकडले. तसेच, त्यांच्याकडून पोलिसांनी १६ लाख किमतीच्या २४ दुचाकी जप्त केल्या.

दुसऱ्या कारवाईमध्ये चिंचवड पोलिसांनी कार भाड्याने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरापींकडून एर्टिगा , स्विफ्ट , इनोव्हा .मारुती ब्रीजा , सिटी कार , हुंदाई असेंटसह एकूण १६ महागड्या गाड्या जप्त केल्या, ज्यांची किंमत १ कोटी २० लाख २० हजार आहे. नमन सहानी , कल्पेश पंगेकर , सानी कांबळे , हितेश चंडालिया , रोनित कदम अशी आरोपींची नाव आहेत. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले कि, आरोपी नमन सहानी आणि कल्पेश पंगेकर हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी ग्रॅजुएट कम्प्लिट केले आहे. मागील एक वर्षांपासून त्यांना पैशाची गरज होती. ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे, अशांचा शोध घेऊन त्यांना कार भाड्याने देण्याचे आमिष दाखवले जायचे आणि नंतर त्यांना मारहाण करून धमकी देऊन त्यांची गाडी दुसऱ्याला विकत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button