breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राम मंदिर बांधून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक | राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अनुगान ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नाशिकच्या पावनभूमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी नाशिकमधील पावत्र भूमित आले आहेत. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरासाठी हा शुभ संकेत आहे.

हेही वाचा    –    नाशिककरांच्या प्रेमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बरसात

अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि करोडो नागरिकांचं होतं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आहे. मोदी है तो मुमकीन है… पंतप्रधान लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप आला. आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणाचीही नाही. भारताचा डंका जगभरात वाजत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींना कोणी कोणी बॉस म्हणते तर मोदींसोबत कोणी सेल्फी काढते. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थ व्यवस्था पोहचली आहे. मोदी देशभक्त राष्ट्रभत नेता आहेत. प्रधानमंत्री झाले हे भाग्यच आहे. भारत जगातील सर्वाधिक युवकांचा देश आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button