breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ शिंदेंकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती…

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात भाजपची सत्ता आणि मुख्यमंत्री होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. एक रिक्षा चालक, कट्टर शिवसैनिक, नगरसेवक, आमदार आणि मंत्रीनंतर आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.

शिंदे यांचा जन्म १९६४ साली सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील होय. त्यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले असून एक रिक्षाचालक म्हणून त्यांनी सुरुवात केली. रिक्षाचालक असतानाच ८०च्या शतकात ते शिवसेनेत दाखल झाले आणि तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १९९७ साली ते ठाणे मनपात नगरसेवक म्हणून निवडून गेले. २००१ मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. २००२ मधील दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यानंतर ३ वर्ष त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते होते.

  • इतक्या कोटींची संपत्ती

एका रिक्षाचालकापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे यांचा प्रवास आता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रत्रिज्ञापत्रात शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाखाहून अधिक संपत्ती आहे. यातील ९.४५ कोटी ही स्थिर तर २.१० कोटी इतकी अस्थिर संपत्ती आहे. सामान्य शिवसैनिक म्हणून शिंदे यांचा प्रवास सुरू झाल्याने पक्षासाठी त्यांनी अनेक आंदोलन केली आहेत. सेनेसाठी ते तुरुंगात देखील गेलेत. त्यांच्यावर १८ गुन्हा दाखल आहेत. प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी त्यांचा व्यवसाय बांधकाम व्यवसाय असे म्हटले आहे. शिंदे यांच्याकडे सात गाड्या असून त्याची एकूण किंमत ४६ लाख इतकी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button