breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Eknath Shinde : छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपा नगरसेवक छिंदमचे पद अखेर रद्द!

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्याचे आदेश नगरविकास विभागाने शनिवारी निर्गमित केले.

छिंदमने छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा ठराव, आयुक्तांनी वेळोवेळी सादर केलेले अहवाल आणि आजवर अवलंबलेल्या तपास प्रक्रियेचा विचार करून छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले. अशाप्रकारे महापुरुषांचा अवमान कुणी करत असेल तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कदापि खपवून घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button