breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

रस्त्यावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज!

Government Scheme For Street Vendor : सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी पीएम स्वनिधी योजना योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी १०,००० रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज १२ महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते.

या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला २०,००० तर तिसऱ्यांदा ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. ही योजना १ जून २०२० रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत अटी व नियंमाचे पालन केल्यास कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.

हेही वाचा – बालेवाडी शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिवलमध्ये ‘बॉईज ४’ चित्रपटाच्या कलाकारांची धम्माल 

या योजनेअंतर्गत तुम्ही वेळेवर कर्ज भरल्यास तुम्हाला ७ टक्के अनुदान देखील मिळते. ही रक्कम ४०० रुपये असून पैसे तुमच्या जनधन खात्यात जमा होतील. तसेच डिजिटल व्यव्हार केल्यास तुम्ही प्रति वर्ष १,२०० रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळवू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button