breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘..तर अजित पवार मुख्यमंत्री होणार’; एकनाथ खडसेंचं विधान चर्चेत

अजितदादांनी अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे

मुंबई : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, सुप्रिम कोर्टाचा निकाल काय येणार याचा अंदाज कोणालाही नाही. न्यायालयाचा निकाल आला आणि हे १६ आमदार अपात्र ठरले तर काय परिस्थिती निर्माण होईल. विशेष म्हणजे या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील नाव आहे. त्यामुळे आपोआप राज्यातील सरकार कोलमडेल. त्यामुळे ज्यांच्याकडे सर्वाधिक बहुमत आहे त्यांना राज्यपालांना बोलवावेच लागणार. एका क्षणात त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. मग अशा कालखंडात तो काही आकड्यांचा खेळ होईल, त्यात महाविकास आघीडीने अजित पवारांना नेतृत्व करण्याची संधी दिल्या का होऊ शकत नाही.

अजित पवार पक्ष सोडून भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही. या पक्षात त्यांना मान आहे, सन्मान आहे. अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच वर्षेानुवर्षे त्यांनी या पक्षात काम करून पक्ष उभा केला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना भीक घालून ते भाजपसोबत जातील असे मला वाटत नाही. म्हणून अजितदादा असे काही करतील असे वाटत नसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button